या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 3178 कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर; येथे पहा जिल्ह्यनुसार यादी..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nuksan Bharpai: राज्यातील खरीप हंगाम 2024 मध्ये झालेल्या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. 2024 मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अखेर या नुकसानीची भरपाई मंजूर करण्यात आली असून जवळपास 3178 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मागील अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील नाशिक पुणे कोल्हापूर छत्रपती संभाजी नगर लातूर अमरावती नागपूर विभागातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे.

हे पण वाचा | लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत अदिती तटकरे यांनी दिली अपडेट..

खरीप 2024 मध्ये झालेल्या नुकसान भरपाई साठी सरकारकडून जवळपास 3178 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. मंजूर झालेल्या रकमेपैकी 1620 कोटी रुपये वाटप करण्यात आली असून उर्वरित 1558 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. यामध्ये नाशिक विभागात जवळपास 14 लाख 988 रुपये नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. यातील दोन लाख 760 रुपये वाटप करण्यात आले आहेत. उर्वरित 12 लाख 227 रुपये वाटप करण्याचे शिल्लक आहेत. त्याचबरोबर पुणे विभागात 28 लाख 299 रुपये मंजूर झाले आहेत. यापैकी सर्वच रक्कम वाटप करण्याची शिल्लक आहे. पुणे विभागात अहिल्यानगर पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणखीन नुकसान भरपाईची रक्कम देण्यात आली नाही.

हे पण वाचा | शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे जमा; तुमच्या कोणत्या खात्यात पैसे जमा झाले? जाणून घ्या सविस्तर

कोल्हापूर विभागात सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश असून या जिल्ह्यांसाठी पंधरा लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. यातील दोन लाख 57 हजार रुपये वाटप करण्यात आले असून उर्वरित 12 लाख 81 हजार रुपये रक्कम वाटण्याची शिल्लक आहे. तसेच छत्रपती संभाजी नगर विभागामध्ये संभाजीनगर जालना आणि बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांसाठी 56 लाख 418 रुपयाचा निधी मंजूर झाला असून, यापैकी अकरा लाख 800 46 रुपये नुकसान भरपाई वितरित करण्यात आली आहे. उर्वरित 44 लाख रुपयाचा निधी वितरित करण्यास शिल्लक आहे. Nuksan Bharpai

हे पण वाचा | सोने खरेदीदारांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; जाणून घ्या आजचे दर

लातूर विभागात लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान भरपाई 62 लाख रुपये मंजूर झाली आहे. अमरावती विभागात 62 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी 36 लाख लाख रुपयाचे वाटप केले असून उर्वरित 26 लाख रुपयांचा निधी लवकरच वाटला जाणार आहे. अमरावती विभागात बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. नागपूर विभागात 20 लाख रुपयाचा निधी मंजूर झाला असून यातील 17 लाख रुपयांची वाटप करण्यात आले आहे आणि केवळ दोन लाख रुपये वाटण्यासाठी शिल्लक आहेत. नागपूर विभागात वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!