Maharashtra Weather Update: महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल होणार आहे. राज्यात 24 एप्रिल पासून उष्णतेच्या लाटेसोबत गारपीट आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने राज्यातील 15 जिल्ह्यासाठी येलो अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट जारी केली आहे. भारतीय हवामान विभागाने 24 एप्रिल रोजी अमरावती चंद्रपूर नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये तापमान 45°c च्या वर जाण्याची शक्यता वर्तवली आहे. या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहे. दरम्यान कामाशिवाय घराबाहेर नागरिकांनी पडू नये असा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित विदर्भ आणि मराठवाडा मध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या ठिकाणी तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअस वाढण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा | मोठी बातमी! लाडक्या बहिणींना एप्रिल-मे महिन्याचे 3,000 रुपये एकत्रित मिळणार? वाचा सविस्तर..
26 एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्यात पावसाची शक्यता असून, 27 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाटमाता सांगली सोलापूर लातूर धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यामध्ये विजेच्या कडाक्यासोबत गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या भागामध्ये हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केले आहे. Maharashtra Weather Update
हे पण वाचा | या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 3178 कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर; येथे पहा जिल्ह्यनुसार यादी..
कॉमन विभागाने नागरिकांना दुपारच्या काळात शक्यतो घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे. भरपूर पाणी पिण्याचे आणि थेट सूर्यप्रकाशापासून संरक्षण घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विजेच्या कडकडाटाच्या वेळी उघड्यावर किंवा झाडाखाली थांबू नये असे देखील सांगण्यात आले आहे. पुढील काही दिवस हवामानाच्या दृष्टीने बाहेर पडणे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे स्थानिक हवामान खात्याच्या सूचनेचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे असे हवामान खात्याने सांगितले आहे.