Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध ठरली आहे. या योजनेअंतर्गत मार्च महिन्यापर्यंत महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये याप्रमाणे एकूण तेरा हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत. दरम्यान आता लाडक्या बहिणींना या योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न पडला आहे. एप्रिल महिना संपण्यासाठी सात आठ दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र अजून देखील एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमाना झाल्यामुळे महिलांना एप्रिल महिन्याचे पैसे कधी मिळतील हाच प्रश्न निर्माण होत आहे. आता एप्रिल महिन्याच्या आत्याबाबत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर माहिती..
एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार?
आदिती तटकरे यांनी पुणे या ठिकाणावरून माध्यमांशी बोलताना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. आदिती तटकरे म्हणाल्या की, एप्रिल महिना संपण्याआधी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता वितरित केला जाणार आहे. दरम्यान अजून अदिती तटकरे यांनी याबाबतची तारीख सांगितली नाही. परंतु आठवडाभरात एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी एप्रिल महिन्याचे 1500 रुपये महिलांचा खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. Ladki Bahin Yojana
हे पण वाचा | Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्यात मिळणार 3,000 रुपये; तुम्हाला मिळणार का? जाणून घ्या..
काय म्हणाले आदिती तटकरे?
सध्या लाडकी बहीण योजनेचे नियम बदलणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान या सगळ्यावर आदिती तटकरे यांनी स्पष्ट भूमिका दिली आहे. मला वाटतं या योजना संदर्भात गैरसमज पसरवून या योजनेबाबतची चुकीची माहिती पसरवली जात आहे. अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. हा निकषांमधील नियम आहे त्यामुळे याबाबतची पडताळणी होणार आहे असे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.
हे पण वाचा | या लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत 1,500 रुपये; तुमचं नाव आहे का? असं चेक करा..
ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत त्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाहीत. ज्या महिला नमो शेतकरी योजनेतून लाभ घेत आहेत त्यांना 1500 रुपये एवजी फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत. हे सर्व शासन निर्णयानुसार आहे. दोन कोटी 47 लाख महिला लाडकी बहिणी योजनेसाठी लाभार्थी आहेत. या अगोदरचा लाभ दिला होता तेव्हा दोन कोटी 33 लाख महिला होत्या ज्या महिला पात्र आहेत त्यांना लाभ मिळत आहे.
5 thoughts on “लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत अदिती तटकरे यांनी दिली अपडेट..”