पीक विम्यासाठी शासनाचे नवीन निकष; आता या शेतकऱ्यांना मिळणार नाही पिक विम्याची रक्कम..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop Insurance: नमस्कार शेतकरी मित्रांनो, पिक विम्याच्या कंपन्यासाठी शासनाने नवीन निकष लावले आहेत. नवीन निकषा अनुसार कोणता बदल करण्यात आला आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. उभे पीक असताना व पीक काढणी केल्यानंतर नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसान झाले तर शेतकऱ्यांना यापुढे पीक विम्याची नुकसान भरपाई मिळणार नाही तर पीक कापणी प्रयोगावर अवलंबून विमा कंपनी नुकसान भरपाई देणार आहे. सध्या राज्यात सातत्याने अतिवृष्टी व बे मोसमी पावसामुळे पीक नुकसानीचे प्रमाण वाढले असल्यामुळे पीक विमा कंपन्यांच्या निकषात बदल केले आहेत.

हे पण वाचा | सोयाबीनच्या बाजारभावात मोठी वाढ! आवक देखील वाढली; जाणून घ्या आजचे बाजार भाव

मात्र आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईसाठी दोन्हीच निकष लावले जाणार आहेत. राज्य सरकारने बैठकीच्या चर्चेनंतर ही बातमी समोर आली आहे. अलीकडच्या काही वर्षात निसर्ग लहरीत फार बदल झाला आहे. कडक उन्हाळ्यात मध्यम आभाळ येथे व पाऊस पडतो. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान होते. पावसाळ्यात ढगफुटी सारखा धो दो अतिवृष्टी व शांतधर पाऊस पडतो. यामुळे झालेल्या पीक नुकसानीची भरपाई विमा कंपन्याकडून दिली जाते. Crop Insurance

केंद्र सरकारचे पीक कापणी प्रयोगावर पीक नुकसान भरपाई देण्याचे निकष ठेवले आहेत. मात्र राज्य शासनाने प्रतिकूल घटकामुळे पेरणी न होणे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती झालेली नुकसान काढणी पश्चात नुकसान व स्थानिक नैसर्गिक आपत्ती या चार बाबींचा समावेश केला होता. 2016 ते 2017 व 2023 ते 2024 या आठ वर्षात युवा कंपन्यांना चार हजार दोनशे एक कोटी रुपये हप्ता राज्य शासनाकडून दिला असून. शेतकऱ्यांना 32648 कोटी रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे. विमा कंपन्यांना दहा हजार पाचशे त्रेचाळीस कोटी रुपयांचा नफा झाला आहे.

हे पण वाचा | लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर माहिती..

शेतकऱ्यांसाठी महत्त्वकांशी ठरलेल्या एक रुपयात पिक विमा योजना होणारा भ्रष्टाचारामुळे बंद करून केंद्राच्या नियमानुसार शेतकऱ्यांना प्रत्येक पिकाच्या विम्याचे रक्कम भरावी लागणार आहे. एक रुपयात पिक विमा भरायच्या असल्याने विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या लाखाच्या पटीत वाढली होती. मात्र आता रक्कम भरावी लागणार असल्याने विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आपोआप कमी होणार आहे. एक रुपयात पिक विमा योजनेमुळे बोगस पिक विमा मोठ्या प्रमाणात उचलला जात होता त्यामुळे नवीन निकषानुसार ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

error: Content is protected !!