Beneficiary Status: राज्यातील व देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी केंद्र सरकार अंतर्गत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व राज्य सरकार अंतर्गत नमो शेतकरी महासन्मान योजना राबवली जाते. या दोन्ही योजनेअंतर्गत दरवर्षी 12 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येते. या आर्थिक लाभातून शेतकरी आपल्या शेतीसंबंधीतील आवश्यक गरजा भागू शकतात. दरम्यान या दोन्ही योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आता फार्मर आयडी काढून घेणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्याने फार्मर आयडी काढले आहे त्या शेतकऱ्यांना पुढील सन्माननीय योजनेचा हप्ता मिळणार आहे.
हे पण वाचा | पीक विम्यासाठी शासनाचे नवीन निकष; आता या शेतकऱ्यांना मिळणार नाही पिक विम्याची रक्कम..
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत दरवर्षी प्रत्येकी सहा हजार रुपये प्रमाणे तीन समान हप्तमध्ये दोन हजार रुपयाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये महाडीबीटी द्वारे जमा केली जाते. पी एम किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाकडून चालवली जाते. त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाकडून चालवली जाते. महाराष्ट्रात नमो शेतकरी योजना 2023 24 चा अर्थसंकल्पापासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना सहा हप्त्याची रक्कम देण्यात आली आहे.
हे पण वाचा | सोयाबीनच्या बाजारभावात मोठी वाढ! आवक देखील वाढली; जाणून घ्या आजचे बाजार भाव
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत देखील देशातील शेतकऱ्यांना 19 हप्त्याची रक्कम मिळाली आहे. लवकरच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता मिळणार आहे. या योजनेतून मिळणाऱ्या लाभाची रक्कम सुरू ठेवण्यासाठी आता शेतकऱ्यांना अँग्रीस्टॉक पोर्टल अंतर्गत फार्मर आयडी तयार करणे म्हणजे शेतकरी ओळखपत्र तयार करून घेणे आवश्यक आहे. जे शेतकरी फार्मर आयडी तयार करणार नाहीत त्यांना या दोन्ही योजनेचा लाभ मिळणे बंद होणार आहे. त्यामुळे या दोन्ही योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी फार्मर आयडी काढणे अतिशय आवश्यक आहे.
हे पण वाचा | सोन्याच्या दरात मोठा बदल! खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी; जाणून घ्या आजचे दर..
फार्मर आयडी काढण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
फार्मर आयडी म्हणजेच शेतकऱ्यांसाठी ओळखपत्र तयार करणे. ज्या शेतकऱ्यांनी अजून फार्मर आयडी काढले नाही त्यांनी स्वतःचे आधार कार्ड सातबारा उतारा गट क्रमांक नमुना खाते उतारा क्रमांक मोबाईल क्रमांक या कागदपत्रासह जवळील सीएससी केंद्राला भेट द्यावी. फार्मर आयडी नोंदणी संदर्भात तलाठी कार्यालय कृषी कार्यालय आणि सीएससी केंद्र चालकाकडून संपूर्ण माहिती जाणून घ्यावी.
हे पण वाचा | लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर माहिती..
नमो शेतकरी योजनेअंतर्गत सहाव्या हप्त्याची रक्कम राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये महाडीबीटी द्वारे जमा करण्यात आली आहे. म्हणजेच राज्यातील शेतकऱ्यांना योजनेतून प्रत्येकी 12 हजार रुपये मिळाले आहेत. पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 19 हप्त्याचे एकूण 38 हजार रुपये मिळाले आहेत. या दोन्ही योजनेअंतर्गत एकूण 50 हजार रुपयांचा आर्थिक लाभ राज्यातील शेतकऱ्यांना मिळाला आहे. Beneficiary Status
भारतात जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीला आधार क्रमांक अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे देशातील शेतकऱ्यांना एक युनिक आयडी दिले जाणार आहे. शेतकऱ्यांचे फार्मर आयडी आणि फार्म आयडीचे रेकॉर्ड यामध्ये दाखवले जाईल. फार्मर आयडी आणि फार्म आयडी आधार सोबत लिंक केल्यानंतर पिक विमा आणि पीक कर्ज अशा अनेक शेती संबंधित योजनेचा लाभ आणि मंजुरी शेतकऱ्यांना डिजिटल पद्धतीने मिळेल. फार्मर आयडीद्वारे शेतकऱ्यांना डिजिटल लाईफ करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे